नगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेविका रूपालीताई वारे यांनी उपनगरातील पाणी टंचाई संदर्भात उपायुक्त यशवंत डांगे यांना मोकळी पाण्याची बाटली भेट देऊन नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा इशारा नगरसेविका रूपालीताई वारे यांनी दिला.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून पाणी प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येत्या आठ दिवसांमध्ये सावेडी उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असा इशारा नगरसेविका रूपालीताई वारे यांनी दिला. तसेच अधिकाऱ्यांची तक्रार पालकमंत्री यांच्याकडे करणार असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
Post a Comment