मुंबई : आमच्यामध्ये कोणताही वाद नसून आम्ही एकत्रच असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी जाहीर केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात अखेर दिलजमाई झाल्याचे चित्र बुधवारी मुंबईत दिसून आले. या दोन्ही नेत्यांनी बुधवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीला हजेरी लावली. तसेच, ते एकमेकांच्या शेजारीच बसले होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, खासदार कुमार केतकर, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार आदी उपस्थित होते.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी थोरात यांची भेट घेऊन या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता.
बुधवारी मुंबईत पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. या बैठकीत या दोन्ही नेत्यांनी शेजारी बसत मनमुराद गप्पा मारत दुरावा मिटल्याचे संकेत दिल्याने कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. आगामी निवडणुकींमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज उपस्थित सर्वच नेत्यांनी यावेळी बोलून दाखवली.
Post a Comment