संगमनेर : मुळात सत्यजीत यांनी अपक्ष उमेदवारी करण्यामागे तांत्रिक चुकीचे कारण आहे. जर माझे हे दुखणे नसते आणि मी नाशिकमध्ये असतो, तर ही चूकही झाली नसती. सध्या जरी सत्यजित अपक्ष असले तरी ते फार काळ अपक्ष राहणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
थोरात आज सायंकाळी संगमनेरला आले. संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना थोरात यांनी सुरुवातीला नागपूरमध्ये आपण कसे घसरून पडलो. त्यानंतर पुढे कसे उपचार झाले. या विषयी सविस्तर माहिती दिली.
भारत जोडा यात्रेत त्यांनीही मोठे काम केले आहे. काँग्रेसचा विचार त्यांच्यात रुजला आहे. आम्ही कोणाही काँग्रेसशिवाय दुसरा विचार करू शकत नाही. त्यामुळे सत्यजित यांना काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसलाही सत्यजीतशिवाय करमणार नाही. त्यामुळे त्यांचा काय निर्णय करायचा, ते लवकरच करू, असेही थोरात म्हणाले.
भाचा सत्यजीत यांना सल्ला देताना थोरात म्हणाले, सत्यजित तुमच्या विजयात डॉ. सुधीर तांबे यांचा मोठा आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघात त्यांचा दांगडगा जनसंपर्क आहे. असेच काम तुम्हालाही करायचे आहे, हे लक्षात ठेवा. पुढे अपक्ष राहायचे की काय करायचे हेही आपण लवकरच ठरवू, असेही थोरात म्हणाले.
Post a Comment