पुणे : भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांच वर्तन बदलत असते. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असंच एक वेगळ्या प्रकारचे माझे आजचे निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती, असा दावा आमदार रोहित पवारांनी ट्वीटमधून केला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्ट हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवणार की नाही याबद्दल आज निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान झालेला युक्तिवाद पाहता शिंदे गट व भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत हा दावा केला आहे. सत्ताधारी पक्षात भूकंप येण्याची शक्यताच वर्तवली आहे.
आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आहे. त्यांची बॉडी लँग्वेज पडलेली दिसत होती असे रोहित पवार म्हणाले आहेत. अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फाईल्स मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचे समजले असेही ते म्हणाले. रोहित पवारांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Post a Comment