मुंबई : खासदार संजय राऊत हे जगातील आठवे अजूबे आहेत, असा मिष्किल टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २०२४ च्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाची अवस्था ही ‘बेडका’प्रमाणे होईल, अशी टीका केली होती. यावरून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना जोरदार टोला लगावला.
संजय राऊत यांच्या मते ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ होतो. ते म्हणतात, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा. मग तुम्ही आपल्या मुलाला डॉक्टर करणार की कंपाऊंडर? अशांना गांभीर्याने घेऊ नका. महाराष्ट्र चालवणे काही ‘हास्य जत्रा’ नाही आणि त्यातही सात अजूबे इस दुनिया में… संजय राऊत हे जगातील आठवे अजूबे आहेत, असा मिष्किल टीका वनमंत्री मुनगंटीवार यांनी केली.
Post a Comment