पारनेर : पपत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले असुन दैनिक मराठवाडा साथी वृत्तपत्राचे पारनेर तालुका प्रतिनिधी श्रीकांत चौरे यांना पश्चिम महाराष्ट्रातून "पत्रकारिता जीवनगौरव " राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून गेले काही वर्षात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राजकीय , सामाजिक , कला, क्रीडा , संस्कृतीक, धार्मिक तसेच विविध क्षेत्रातील विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण लिखाण करून आपल्या पारदर्शक निर्भीड व अभ्यासू पत्रकारितेचा ठसा उमटविला आहे.
याची दखल घेत पश्चिम महाराष्ट्रातून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन लवकरच महाराष्ट्रातील मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना पत्रकारिता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व दै.मराठवाडा साथीच्या वतीने मागील 3 वर्षांपासून देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार - 2023 ची घोषणा निवड समितीने केली आहे. या वर्षी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांसोबतच 'पत्रकारिता जीवन गौरव' पुरस्कार व जनसंपर्कात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना 'कार्यगौरव' पुरस्कार देण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक विभागातून पुरस्कार देण्यात येणार आहेत. लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबादेत या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली.
यंदाच्या पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड समितीने दैनिक सकाळ मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक दयानंद माने, मुुंबईतील दैनिक पुढारीचे सीनियर स्पेशल करस्पॉन्डन्स चंदन शिरवाळे, दैनिक लोकमतचे सहायक संपादक पवन देशपांडे, युनिसेफ महाराष्ट्रचे राज्य सल्लागार तानाजी दा. पाटील यांची तर 'पत्रकारिता जीवन गौरव' पुरस्कारासाठी दैनिक आनंद नगरीचे संस्थापक संपादक शिवरतन मुंदडा व 'कार्यगौरव' पुरस्कासाठी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय पाटील, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच विभागातून मोठ्या प्रमाणात पुरस्कारासाठी प्रवेशिका आल्या होत्या. निवड समितीने पुरस्कारांसाठी आलेल्या साहित्यांचे परीक्षण करून विजेत्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
विभागीय पुरस्कार प्राप्त मान्यवर !
पश्चिम महाराष्ट्र विभाग : श्रीकांत चौरे (दै.मराठवाडा साथी, पारनेर तालुका प्रतिनिधी) यांना राज्यस्तरीय तर जिल्हास्तरीय पुरस्काराने नवनाथ खिल्लारे (दै.नवराष्ट्र,पंढरपूर प्रतिनिधी),अशोक सूर्यवंशी (दै.मराठवाडा साथी,मिरजगाव प्रतिनिधी),नरहरी शहाणे (दै.मराठवाडा साथी, पाथर्डी तालुका प्रतिनिधी),अजय नजन (दै.मराठवाडा साथी, शेवगाव तालुका प्रतिनिधी),किसन पवार (दै.मराठवाडा साथी, कोपरगाव तालुका प्रतिनिधी)
कोकण विभाग : सचिन दामोदर कांबळे (टाईम्स् नाऊ न्यूज चॅनल, रत्नागिरी), विनोद पवार (दै. पुढारी, मंडणगड प्रतिनिधी), अमरावती विभाग : गुलाबराव इंगळे (दै. सकाळ, जळगाव जामोद, तालुका प्रतिनिधी), सागर झनके (दै. आधुनिक केसरी, जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी), अमोल गावंडे (दै. निर्भीड स्वराज संपादक, खामगाव), किरण डोंगरदिवे ( मुक्त पत्रकार).
मराठवाडा विभाग : बाबा देशमाने (दै.रिपाेर्ताज,संपादक, बीड),चंद्रकांत तारू (दै.सकाळ,पैठण तालुका प्रतिनिधी), सचिन बडे (लोकशाही न्यूज चॅनल,औरंगाबाद), प्रा.डॉ. विठ्ठल जायभाये (मुक्त पत्रकार, परभणी),आनंद इंदानी (दै.सकाळ,बदनापूर तालुका प्रतिनिधी), सचिन कोरडे (दै.आधुनिक केसरी, उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी),संग्राम वाघमारे (दै.पुढारी, चालकूर तालुका प्रतिनिधी),गोकुळसिंग राजपूत (दै.आनंद नगरी, सोयगाव तालुका प्रतिनिधी),शकील खलिफा (दै.देशोन्नती, पैठण तालुका प्रतिनिधी),गोकुळ लांडे (दै.मराठवाडा साथी, गंगापूर प्रतिनिधी), संदीप मानकर (दै.आधुनिक केसरी, सिल्लोड तालुका प्रतिनिधी),सुरेश वायभट (पैठण तालुका प्रतिनिधी), प्रा.बिभीषण चाटे,(दै.संकेत,बीड), प्रा. बाळासाहेब बोराडे (दै.आधुनिक केसरी, जालना जिल्हा प्रतिनिधी)
विदर्भ विभाग : प्रमोद पाणबुडे (दै.साहसिक, वर्धा), एकनाथ चौधरी (दै.महाराष्ट्र टाईम्स,वर्धा प्रतिनिधी),
नाशिक विभाग : किरणकुमार आवारे (दै.लोकनामा,निफाड तालुका प्रतिनिधी),बंडू खडांगळे (दै.आधुनिक केसरी,दिंडोरी तालुका प्रतिनिधी),मनोहर बोचरे (दै.सकाळ,देवगाव प्रतिनिधी) यांच्या नावाची सर्व परीक्षक मंडळीने निवड केली असून लवकरच निवड समिती व सदर पुरस्काराचे आयोजक महाराष्ट्र स्तरावरील मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्काराचे वितरण करत सदर सन्मानार्थिला पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकार श्रीकांत चौरे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय " पत्रकारिता जीवनगौरव " पुरस्कारामुळे पारनेर नगर मतदार संघात, एक सर्व सामान्य तरुणाने आपल्या अंगी असनाऱ्या जिद्ध चिकाटी, प्रामाणिकपना व पारदर्शक अभ्यासू पत्रकारितेतून सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या बळावर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अल्पावधीतच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे. माझ्या या पत्रकार बंधुच्या अष्टपैलू कर्तुत्वाचा मला अभिमान आहे. त्यांना यापुढील काळात पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग यश मिळो व मतदार संघात त्यांच्या यशाचा आलेख असाच उंचावत जावो त्यांचे अभिनंदन करतो व भावी कार्यास शुभेच्छा देतो. - आमदार नीलेश लंके
Post a Comment