सोसायटी हंगामार्फत सुरु केले कृषी सेवा केंद्र ...

पारनेर : कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व विकशीत झालेले औषधे, खते व मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून विकसीत तंत्रज्ञानाचा लाभ माझ्या शेतकरी बांधवांना मिळावा म्हणून नेहमीच आग्रही आसनारे, पारनेर - नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे कृषी प्रदर्शन असो की कृषी विषयक इतर लाभाच्या योजना बळीराजा पर्यंत पोहचविन्याचा नेहमीच प्रयत्न करत आसतात. 


त्याच प्रमाणे शेतकऱ्यांची कामधेनू असनारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून हंगा येथे कृषीसेवा केंद्र सुरु करत तालुक्यात एक अनोखा उपक्रम पारनेर तालुक्याचे सुपुत्र तथा कृषी सह संचालक पुणे व कृषीधीकारी विलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी हंगा येथे चालू केला.

या आनोख्या उपक्रमास आ. लंके यांनी हिरवा कंदील दाखवत मौजे हंगा येथे कृषि सेवा केंद्र या नवीन दुकानाचे उद्घाटन आ. निलेश लंके यांचे हस्ते संपन्न झाले.

गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मार्फत सदर दुकान चालविले जाणार आहे. या प्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग पुणे 5 चे नाईकवाडी, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश औटी (सहायक उपनिबंधक पारनेर) यांच्या अध्यक्षतेखाली हंगा गावचे सरपंच जगदीप साठे, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब दळवी, उपाध्यक्ष भाऊसाहेब रासकर , हंगा गावाचे मा. सरपंच तथा सेवा सोसायटीचे मा. चेअरमण राजेंद्र शिंदे , युवा नेते दिपक लंके , उपसरपंच माया साळवे , सतिष दळवी , संदीप शिंदे , बाळासाहेब शिंदे , राजु सोंडकर ,सोपान दळवी , रामदास साठे , बबन गाडे , राजेंद्र लोंढे , सविता नगरे , अलकाताई नगरे यांच्या सह विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

मार्केटमधील निविष्टा किमतीपेक्षा 10 ते 20 टक्के कमी दराने कृषि निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असे या वेळी सोसायटीचे चेअरमन आबा दळवी व व्हा.चेअरमन भाऊ रासकर यांनी सांगितले.


उद्घाटन प्रसंगी आमदार मा.निलेश लंके यांनी स्वतः कीटकनाशके खरेदी करून प्रथम बील फाडले व खरेदी केलेल्या निविष्टा उपस्थित शेतकर्यांना त्यांचे शेतात वापरण्यासाठी आपल्या मनोगतात ग्रामस्थांना आवाहन केले. या प्रसंगी  कृषी सहसंचालक, नाईकवाडी साहेब, तालुका कृषि अधिकारी विलास गायकवाड, सहायक निबंधक गणेश औटी यांनी मार्गदर्शन केले.


त्याच प्रमाणे सोमवारी सीताफळ उत्पादक शेतकरी कार्यशाळा स्थळ राळेगण थेरपाळ प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष राजाराम देशमुख  ( माजी कुलगुरू  MPKV राहुरी ), रफिक नायकवाडी ( JDA पुणे ) ,मा.विलास राव गायकवाड  ( TAO पारनेर ) , विद्यापीठ शास्त्रज्ञ  डॉ. दळवे  ( बहार व्यवस्थापन ) , डॉ. सुनील लोहाटे साहेब ( किड रोग नियंत्रण ), डॉ.जगताप साहेब ( अन्न द्रव व्यवस्थापन)  वैभव थोरे साहेब (AO निघोज ) यांनी सदर सिताफळ पिकाबाबत विषयनिहाय सखोल मार्गदर्शन केले व उपस्थित शेतकरी बांधवांचे शंकेचे, प्रश्नांचे उत्तर देऊन समाधान केले यावेळी चंद्रकांत क्षिरसागर  AS निघोज १, राहुल क्षिरसागर AS निघोज २,भारत बोर्डे कृस , संदिप गायकवाड कृस व मोठ्या संख्येने सिताफळ उत्पादक शेतकरी या वेळी उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post