धुळे : शरद पवार आणि संजय राऊत या जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहे. पवार आणि राऊत फाटक्या नोटा येत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांना लक्ष केले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत असतांना आपल्याच सरकारमधील मंत्र्यावर टीका केली आहे.
तर दुसरिकडे शरद पवार यांच्यासह संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. आदिवासी मंत्रीच गौडबंगाल करत असल्याचा आरोप करत पडळकर यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
शरद पवार आणि संजय राऊत यांनी घाण आणि नीच राजकारण केलं. त्यामध्ये शरद पवार यांनी नेहमी अन्यायच केला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली तेव्हाही शरद पवार यांच्या जवळच्या माणसानेच विरोध केल्याची आरोपही पडळकर यांनी केला.
विविध जातीच्या लोकांवर अन्याय करण्यासाठी शरद पवार यांनी काही माणसं जवळ ठेवली होती. ती देखील आदिवासी समाजाची होती. त्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय करणारा सूत्रधार शरद पवार असल्याचा आरोपही पडळकर यांनी केला आहे.
Post a Comment