नगर : दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या एक लाख सहा हजार ५३५ गोण्यांची आवक झाली.
नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची ५८ हजार ५५४ क्विंटल आवक झाली. कांद्याची आवक चांगली असली तरी भावात मात्र घसरण झाली आहे.
लाल कांद्याचे भाव : एक नंबर : 750 ते 1050, दोन नंबर : 500 ते 750, तीन नंबर : 250 ते 500, चार नंबर=150 ते 250.
शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
सध्या बाजारात फक्त लाल कांदा विक्रीस येत आहे. मात्र गावरान कांदा दिसून येत नाही. कांद्याच्या भावात सध्या घसरण सुरु झाली आहे.
Post a Comment