मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच पहाटे सरकार स्थापन झाल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.
टीव्ही-९ मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाले. पहिला हा उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी निवडणुका आमच्यासोबत लढल्या, पण जेव्हा त्यांना हे लक्षात आले की ते मुख्यमंत्री होऊ शकतात. तेव्हा त्यांनी माझा फोन घेणेही बंद केले. त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची इतकी प्रिय होती की त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेससोबत हातमिळवणी केली.
दुसरा विश्वासघात राष्ट्रवादीने केला, पण त्यांना मी कमी दोष देईल. कारण आम्ही निवडणुका त्यांच्यासोबत लढलो नव्हतो. उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करत असताना आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती की आम्हाला स्थिर सरकार हवय आहे.
तेव्हा शरद पवारांशी चर्चा झाली होती. त्यानंतरच गोष्टी ठरल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या कशा बदलल्या हे सर्वांनी पाहिले आहे. या त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Post a Comment