विखे यांच्या पाठबळामुळे अळकुटी-निघोज गटात मोठी कामे....

निघोज :  अळकुटी - निघोज जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल व दुग्ध पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी पाठबळ दिल्याने ही विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी दिली आहे. 


जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई संदिप वराळ पाटील यांच्या निधीतून मंजूर निघोज (ता.पारनेर) ढवणवाडी येथे जि.प.प्रा.शाळेस वाल कंपाऊंड करणे - 10 लक्ष रुपये या कामाचे लोकार्पण संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.व्हा.चेअरमन गोरक्ष ढवण हे होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच माऊली वरखडे,तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश लाळगे,ग्रामपंचायत सदस्य योगेश वाव्हळ,राहुल पांढरकर,मा.ग्रामपंचायत सदस्य पोपट ढवण,भास्कर वराळ,प्रकाश पांढरकर,रंगनाथ ढवण,दिपक ढवण,भास्कर ढवण,सचिन ढवण,संतोष ढवण,शंकर ढवण, नवनाथ ढवण,संकेत ढवण,विष्णू ढवण,उमेश ढवण,युवराज ढवण,शिवाजी ढवण,योगेश ढवण,बाबाजी ढवण,राजू ढवण,नामदेव ढवण,चंद्रकांत ढवण,सुदाम ढवण,श्रीराम ढवण, लहू ढवण,शहाजी गोपाळे,सुनिल ढवण,रामा ढवण,गोसावी सर,शिंदे सर,किसन घोगरे, अस्लमभाई इनामदार,निलेश घोडे,अक्षय वराळ,बंटी लंके,ठेकेदार मनोज लामखडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

वराळ पाटील यावेळी म्हणाले गेली पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी आळकुटी - निघोज जिल्हा परिषद गटात विकासकामे होण्यासाठी सातत्याने जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांना मार्गदर्शन करीत पाठबळ देण्याचे काम केले. 

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल व दुग्ध पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी सातत्याने आमच्या मागणीचा राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत विकासकामे मोठ्या प्रमाणात दिली आहेत. 

गेली पाच वर्षात पन्नास कोटी पेक्षा जास्त विकासकामे दिली असून पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहे. येत्या दिड वर्षात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात शेकडो कोटींची विकासकामे होणार असल्याची माहिती वराळ पाटील यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post