बाजार समिती निवडणुकीचा बिगूल वाजला....

नगर : जिल्ह्यातील लांबलेल्या 14 बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या निवडणुकीचा भाग म्हणून मतदार यादी अद्ययावत करून ती अंतिम करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक यांनी घेतला आहे. 


राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुधारीत अंतिम मतदार यादी येत्या 20 मार्चला प्रसिध्द होणार आहे.

जिल्ह्यातील नगर, राहुरी, राहाता, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा आणि पारनेर या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. 

यातील बहुतांशी ठिकाणी सहकार खात्याचे अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहत होते. यातील अनेक बाजार समित्यांची निवडणूक कोविड काळात संपलेली आहे. कोविड संकटानंतर सहकार विभागाने वेगवेगळ्या कारणामुळे मुदत संपलेल्या या बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकल्या होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post