सुवर्णा मनोज ईधाटे या महिलेने जिंकली स्कूटी....

निघोज : निघोज सहीत राज्यामध्ये दहा शाखा कार्यरत असलेल्या महागणपती मल्टिस्टेट सोसायटी यांनी निघोज येथे खेळ पैठणीचा खास महिला भगीणिसाठी आयोजित केलेल्या खेळांमध्ये निघोज व परिसरातील हजारो महिला सहभागी होऊन या खेळाचा आनंद घेतला. यामध्ये बहुतांश क्रिडा प्रकारात महिलांनी सहभागी होऊन लाखो रुपयांची बक्षीसे जिंकली. 


सुवर्णा मनोज ईधाटे या महिलेने पहिला नंबर मिळवीत स्कुटी जिंकली. द्वितीय क्रमांक राणी लोखंडे यांनी चक्की जिंकली, तृतीय क्रमांक कोमल नरसाळे, सिमा वराळ, सुप्रिया कवाद यांना सायकल हे बक्षीस मिळाले, सोनल श्रीमंदिलकर, अश्विनी श्रीमंदिलकर,  अश्विनी डोकडे, नम्रता बनसोडे, निलोफर मोमीन,सविता पवार, शोभा येवले कोमल तिकोणे, सविता चौधरी, श्रीदेवी लाळगे, आशा लाळगे, दिपीका शेळके, शितल हरिहर, सिमा सालके, उज्वला गायकवाड, पुजा सरोदे, स्वाती वरखडे, प्रियंका साळवे, करिष्मा वराळ, प्रियंका वराळ, चित्रा घोडे, विद्या वराळ, अमृता शेटे, अनुराधा बेलोटे,  कांचन लंघे, रुपाली लंके, कोमल ढवळे,सविता लंके, शैला सोनवणे, दिपाली लोखंडे, विजया वरखडे, मनिषा शेवाळे, दिपाली सोनवणे,पुष्पा वराळ, आदिंनी पैठणी सहीत अनेक बक्षिसे जिंकली आहेत . कैलास मुसळे, निलेश पडवळ, अमित काताळे आदिंनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. 

यावेळी सरपंच चित्राताई वराळ पाटील, कविता लंके, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, महागणपती मल्टिस्टेट सोसायटीचे चेअरमन विकास बेंगडे,ज्येष्ठ संचालक पवन हगवणे, मुख्य समन्वयक शोभा टिकेकर, सल्लागार सलिम हावलदार, पांडुरंग बेलोटे, सुरेश खोसे, लक्ष्मण लाळगे, दत्ताशेठ नरवडे, दिलीप कवाद, दत्तात्रय चौधरी, अंजली नरसाळे, मार्केटिंग मॅनेजर राकेश सोनवणे आदिंच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

यावेळी खेळ पैठणीचा यामध्ये सहभागी झालेल्या हजारो महिलांना महागणपती मल्टिस्टेट सोसायटी वतीने बक्षीसे देण्यात येणार असून यामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी महागणपती मल्टिस्टेट सोसायटी या निघोज शाखेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महागणपती मल्टिस्टेट सोसायटी माध्यमातून झालेल्या या खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. निघोज आणी परिसरात एवढा मोठा कार्यक्रम होण्याची ही पहिलीच वेळ, तसेच हजारो महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन खेळाचा आनंद घेतला. तसेच महागणपती मल्टिस्टेट सोसायटी वतीने लाखो रुपयांची बक्षीसे देउन सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला त्यांनी बक्षीस देऊन सन्मानित केले आहे ही आनंददायी बाब असल्याची प्रतिक्रिया सरपंच चित्राताई वराळ पाटील यांनी व्यक्त केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post