संगमनेर : घारगाव येथील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतीच्या बांधाला असलेले वाळलेले गवत जाळण्यासाठी भर दुपारी आग लावली, ही आग लावताना संबंधित शेतकऱ्याने कुठलीही खबरदारी न घेतल्याने या आगीने रौद्ररूप धारण करत जवळच उभ्या असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मारुती सुझुकी वॅगनार गाडीला आपल्या कवेत घेतले. त्यामुळे ही चार चाकी गाडी जळून खाक झाली.
सदरची घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जुन्या पोलीस स्टेशनच्या शासकीय इमारत परिसरात घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील घारगाव येथे जुन्या पोलीस स्टेशनच्या शासकीय इमारत परिसरात येथील शेतकरी जगदीश नानाभाऊ आहेर यांची शेती आहे. त्यांनी शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपल्या शेतीच्या बांधाला असलेले वाळलेले गवत जाळण्यासाठी आग लावली आणि ते तेथून निघून गेले, जाताना त्यांनी आगीची कोणतीही खबरदारी घेतली नाही
तसेच कोणालाही काहीही सांगितले नाही. त्यामुळे भर उन्हात बांधाला लावलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केले. या परिसरातच घारगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी प्रमोद संपत चव्हाण यांची मारुती सुझुकी वॅगनार गाडी नंबर एम.एच १४ बी.आर ७२७ ही गाडी एका शेडनेट खाली उभी केलेली होती.
सदरची आग ही शेडनेटला लागली आणि त्यानंतर या आगीने या चार चाकी गाडीला आपल्या कवेत घेतल्याने ही चार चाकी गाडी जळून खाक झाली. या प्रकरणी प्रमोद संपत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शेतकरी जगदीश नानाभाऊ आहेर यांच्या विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment