नगर : शहरात राज्यातील सत्तेत असलेल्या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या राहाड्यात दोनही गटाकडून दगडफेक करण्यात आली.
केडगाव मध्ये दोन गट समोरासमोर एकमेकांना भिडले असून तुफान दगडफेक करण्यात आली आहे. यात वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
नगर तालुक्यातील एका गावात झालेल्या विवाह प्रसंगी दोन पक्षातील कार्यकर्त्यात वाद झाला. त्यानंतर एका गटाच्या समर्थकांनी केडगावामध्ये येत एका हॉटेलवर दगडफेक केली. त्यास दुसर्या गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर दिले. दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली.
यावेळी रस्तारोको करण्यात आला. या दरम्यान पुन्हा दगडफेक झाली असून रस्त्याने जाणाऱ्या वाहनाचे नुकसान करण्यात आले आहे. दगडफेक झाल्यामुळे केडगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा फौजफाटा तात्काळ केडगाव मध्ये तैनात झाला आहे.
या घटनेमुळे काही काळ नगर-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. काहींनी बायपास मार्गे येण्याचा प्रयत्न केला. मात्र तिकडेही वाहतुकीची कोंडी झाली होती. वाद कोणाचा मनस्ताप मात्र प्रवाशांना झाला.
Post a Comment