मुंबई : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना या अध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी करुणा मुंडे यांची लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच केंद्रीय महिला आयोगाला देखील तक्रार दिली आहे.
मुंडे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, महिला आयोगाचे जे पद आहे, हे न्यायी संस्थेचे पद आहे. रुपाली चाकणकर महिला आयोग पदाचा गैरवापर करत आहे.
ज्या महिला त्यांच्याकडे न्यायासाठी तक्रार घेऊन येतात, त्यांना न्याय तर भेटत नाही. तर त्या महिलांसोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करतात आणि राजकारण करतात. ज्या मोठ्या लोकांच्या तक्रारी त्यांच्याकडे केल्या आहेत. त्या व्यक्तिसोबत त्यांचे फोटो आहेत.
ते आजपर्यंत त्यांच्या सोशल मीडियावर आहेत, त्यांनी काढलेले नाहीत, त्याच्यामुळे लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे आणि केंद्रीय महिला आयोगाला ही तक्रार केली असल्याचे करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे.
या सर्व कारणांमुळे रुपाली चाकणकर यांची आयोगाच्या अध्यक्ष पदावरून मुक्तता करा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment