जिल्हा परिषदेचे आदर्श ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पुरस्कार जाहीर

नगर ः जिल्हा परिषदेने 2018-19 व 2019-20 या दोन वर्षातील आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्काराचे लवकरच समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी या आदर्श पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे.


पुरस्कार मिळालेले ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी असे ः 2018-19 - गणेशकुमार विठ्ठल (पाथर्डी), हितेश सुधाकर ढुमणे (श्रीरामपूर), तानाजी सोनबा पानसरे (श्रीगोंदा), संदीप खंडेराव शेटे (राहुरी), प्रतिभा सोपानराव पागिरे (राहाता), संपद महादेव गोल्हार (शेवगाव), अनिल अंकुश भोईटे (कर्जत), श्रीमती वाळे राणीकुमारी भावका-माधवी शरद बेंद्रे (संगमनेर), किशोर रावसाहेब टकले (जामखेड), सतीश दौलतराव मोटे (नेवासा), सचिन नारायण थोरात (नगर).
2019-20 ः एकनाथ पंढरीनाथ ढाकणे (अकोले), संगीता भानुदास देठे (पारनेर), दिलीप भागीनाथ नागरगोजे (पाथर्डी), प्रदीप गणपतराव आसने (श्रीरामपूर), वैशाली मार्तंड बोरुडे (श्रीगोंदा), रामदास उत्तमराव कार्ले (राहुरी), रविंद्र रामनाथ बोरसे (राहाता), कृष्णदास अर्जुन आहिरे (कोपरगाव), विशाल उत्तम काळे (संगमनेर), निलेश सुभाष टेकाळे (जामखेड), आसाराम मोहन कपिले (नेवासा), उजाराणी बापू शेलार (कर्जत), भाऊसाहेब कुंडलिक पालवे (नगर).

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post