पारनेर : माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे तसेच बीएलओचे व निवडणूक अशी कामे दिल्यामुळे तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांना निवेदन देण्यात आले.
त्याचबरोबर माध्यमिक शाळांमध्ये अनेक स्पर्धा परीक्षांचे आयोजनही केले जाते. त्यात नवोदय प्रवेश परीक्षा प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा एन. एम. एम. एस. परीक्षा एम.टी. एस. परीक्षा, एन.टी.एस. परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा इतिहास, भूगोल, गणित प्रज्ञ- शोध परीक्षा, ज्ञानवर्धनि स्पर्धा परीक्षा, अशा विविध परीक्षांचे, तसेच विज्ञान प्रदर्शन आदी स्तरांवरून कामकाज केले जाते.
तसेच इयत्ता दहावीचा जादा तास, बोर्ड परीक्षा पेपर तपासणी आदी कामांचा अतिरिक्त ताण रिक्त पदांमुळे सेवकांवर पडतो. या सर्व परीक्षांचा कार्यभार व रिक्त पदांचा विचार करता निवडणुकीच्या कामासाठी ठराविक शाळांमधूनच सर्व सेवकांची नियुक्ती न करता सर्व शाळांमधून प्रत्येकी तीन ते चार सेवकांचा सहभाग घेण्याबाबत विचार व्हावा, तसेच बीएलओ कामकाजात माध्यमिक शिक्षकांना न घेता इतर प्राथमिक शिक्षकांचा तेथे विचार करावा, बीएलओ सारख्या अशैक्षणिक कामांसाठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करू नये, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी पारनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब निवडुंगे, सचिव भगवान राऊत, उपाध्यक्ष सुदाम दळवी, सचिव भगवान राऊत, शशिकांत भालेकर, सुरेश थोरात, बाबासाहेब दौंड, जयवंत पुजारी, संतोष व्यवहारे, योगेश खांडरे, संदीप शिंदे, विजय पठारे, संपत गुंड, संजय कारखिले, राजाराम शिंदे, रमेश गायकवाड, सुनील औटी, संजय खोडदे, डी. एस. ठवाळ, डी.व्ही. खोसे, आर. सी. दरेकर आदी उपस्थित होते.
Post a Comment