पवार यांच्याविरोधात हजारे न्यायालयात...

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात अण्णा हजारे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथीत 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात  सुनावणी होणार आहे. 


याच दाखल याचिकेत अण्णा हजारेही अजित पवारांविरोधात न्यायालयात गेले आहेत. ज्येष्ठ विधीज्ञ सतीश तळेकर हे अण्णा हजारे यांची बाजू मांडणार आहेत.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याची चौकशी बंद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण पुन्हा उघडून घोटाळ्याची अधिक चौकशी करायची असल्याचे मुंबई सत्र विशेष न्यायालयात सांगितले आहे.

अजित पवार आणि 76 जणांविरुद्ध पुढील कारवाई करण्यासाठी ठोस पुरावे सापडले नसल्याचं सांगून प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल दोन वर्षांपूर्वी न्यायालयात सादर करण्यात आला. 

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागातर्फे दोन वर्षांपूर्वी 10 सप्टेंबर 2020 ला हा अहवाल न्यायालयात देण्यात आला होता. या अहवालाविरोधात मूळ तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांनी निषेध याचिका दाखल केली होती.

दुसरीकडे ईडीनेही त्यांच्या अहवालात या प्रकरणात पुरावे असल्याचा दावा केला होता. निषेध याचिका आणि ईडी अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात सांगितलं आहे. याबाबत निषेध याचिका दाखल करणाऱ्यांना आपलं उत्तर कोर्टात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post