अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा व नगर तालुक्यातील गावातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. या बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.
गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.
उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सदरील जमिनीवर भटक्या विमुक्त समुहाचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे.
या जागेत काहींनी पक्की घरे बांधली असल्याने संबंधित समुह भयभीत झाला असल्यामुळे नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात चर्चा झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला. असलेल्या कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे. या अतिक्रमण धारकांनी नुकतीच आमदार बबनराव पाचपुते यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती.
Post a Comment