राहुरी : वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 16 हजार 164 कांदा गोण्याची आवक झाली. कांद्याला सर्वाधिक २२०० रुपयांचा भाव मिळाला. कांद्याच्या भावात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 705 ते 2 हजार 200 रूपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 205 ते 1 हजार 700 रूपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 1 हजार 200 रूपये भावाने विकला गेला.
तसेच गोल्टी कांद्याला 900 ते 1300 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 62 कांदा गोण्यांना 2 हजार 500 रूपये 42 कांदा गोण्यांना 2 हजार 400 रूपये 56 कांदा गोण्यांना 2 हजार 300 रूपये भाव मिळाला.
Post a Comment