निघोज : संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सामाजिक उपक्रम लोकपयोगी असून विकासाभिमुख कामांचा पाठपुरावा करीत फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी निघोज- आळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांचे सातत्याने पाठबळ मिळाल्याने विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे प्रतिपादन भाजपाचे डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ अशोकराव सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर,उपसरपंच माऊली वरखडे,भाजपचे ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष मनोहर राउत यांनी प्रथम रक्तदान करीत या रक्तदान शिबीराचा शुभारंभ भाजपचे डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ.अशोकराव सरोदे यांच्या हस्ते उद्घाटन करुन करण्यात आले.या वेळी डॉक्टर सरोदे उपस्थीतांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मुलिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सहदेव आहेर, प्रा.आनंद पाटेकर, उपसरपंच माऊली वरखडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, निघोज व्यापारी असोसिएशनचे मार्गदर्शक बाळासाहेब भंडारी, कुंदनकाका लोढा, माजी उपसरपंच उमेश सोनवणे, हिंदवी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव शिवाजीराव वराळ, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, पत्रकार सुरेश खोसे, पारनेर तालुका भाजपचे ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष मनोहर राउत, भाजपचे जिल्हा सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष विलासराव हारदे, सेनापती बापट पतसस्थेचे संचालक बाबाजी तनपुरे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष रफिकभाई हवलदार, ग्रामपंचायत माजी सदस्य भिमराव लामखडे, निलेश घोडे, संदेश म्हस्के, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील युवा मंचचे तालुका प्रवक्ते प्रतीक वरखडे, आपले गाव गणपती गणेश मंडळाचे अध्यक्ष रवि रणसिंग, सचिव रोहित पठारे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बजरंग वराळ, भास्करराव वराळ, सहाय्यक कामगार तलाठी सुनिल उचाळे,अल्पसंख्याक समाजाचे नेते बशीरभाई मोमीण, भास्करराव सोनवणे, माजी सरपंच शिवा पवार,लोणीमावळा गावचे माजी सरपंच अशोकराव शेळके, गाडीलगावचे माजी सरपंच सुभाष गाडीलकर, दिलीप कवडे, समीर ढवळे, विराज वराळ, आकाश वराळ, बार्टी समतादूत सुलतान सय्यद, हरेश ससाणे, श्रीकांत पवार, ओमकार दुणगुले, अक्षय भंडारी, अमर भंडारी,मनोज लोढा, विशाल जगदाळे, दिनेश ठुबे, गणेश वराळ,सुलतान शेख, निवृत्ती वरखडे ओमकार दुणगुले, सुनिल सोनवणे,अजय सोनवणे, प्रथमेश सोनवणे, विशाल जाधव, महेश ठाणगे, सचिन शिरवले, शुभम शेवाळे, गणेश हरेल आदी तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी बोलताना म्हणाले खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. संसदेत अभ्यासू खासदार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. खासदार विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन वराळ पाटील यांनी व्यक्त केले आहे.
उपसरपंच माऊली वरखडे, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे आदिंनी आपले मनोगत व्यक्त करीत खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटल रक्तपेढी अहमदनगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी रक्तदान करण्यासाठी परिश्रम घेतले असून डॉ.श्वेता कवडे, डॉ.अक्षय महाजन, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते डॉ.रविंद्र माघाडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
विखे पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र सुर्यनारायण यांचे मार्गदर्शन व त्यांनी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्याशी चर्चा करीत या रक्तदान शिबीराचे नियोजन केले होते. आजपर्यंत गेली आठ ते दहा वर्षांत निघोज आणी परिसरात झालेल्या रक्तदान शिबीरात विखे पाटील हॉस्पिटलचा प्रामुख्याने सहभाग असून डॉ राजेंद्र सुर्यनारायण यांनीच या उपक्रमाचे नियोजन करुन ते यशस्वी करुन दाखविले आहे.
एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करीत या शिबिरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील डी फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी यांनी यावेळी सहकार्य केले. प्रतिक वरखडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शेवटी अस्लमभाई इनामदार यांनी आभार मानले.
51 रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदान केले यावेळी विखे पाटील हॉस्पिटल संचलित रक्तपेढीचे सर्व सहकारी व डॉक्टर यांचा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच जैन समाजाने रक्तदान शिबीरासाठी जैन स्थानक उपलब्ध करून दिल्याबद्दल वराळ यांनी जैन समाजाचे पदाधिकारी, सदस्य तसेच व्यापारी यांचे धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले.
Post a Comment