निघोज : महिला समाजाचे प्रबोधन करण्याचे खरे काम करतात म्हणून महिलांना सर्वच क्षेत्रात प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी व्यक्त केले आहे.
येथील वै. बाबा महाराज दुसाणे यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ते उपस्थीतांना किर्तनरुपी मार्गदर्शन करताना बोलत होते. निघोज सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब कोल्हे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली.
दहा वर्षांपासून सुरू केलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात वाबळे महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन सप्ताहाची सांगता शनिवार (ता. १९) करण्यात आली. वाबळे महाराज यावेळी म्हणाले भाऊसाहेब कोल्हे मामा यांनी गेली पंचवीस वर्षांपूर्वी बाबा महाराज दुसाणे यांना काही नातगोत नसताना आधार दिला.
दुसाणे महाराज हे संत होते. ते देवदूत आहेत. हे नंतर ग्रामस्थांच्या लक्षात आले. मात्र कोल्हे यांनी त्यांना शेवटपर्यंत संभाळीत आणी त्यांचे मंदीर बांधीत त्यांची सेवा केली हेच पुण्यकर्म त्यांना व त्यांच्या पुढील सर्व पिढ्यांना आयुष्यभर पुरणार आहे. यासाठी धार्मिक संस्कृती सर्वाधिक महत्वाची आहे.
भगवंत श्रीकृष्णाने गेली सात हजार वर्षांपूर्वी भिंती नसणारे मंदीरे बांधली जेणेकरून सर्व धर्मीयांना या समाजमंदिरात येण्यासाठी परवानगीची गरज राहणार नाही . समाजाभिमुख काम करीत संसाराची धुरा वाहत महिलांचे समाजात मोठे काम आहे. हे सर्वप्रथम कृष्ण भगवंताने ओळखले आणी महिलांना प्राधान्य देण्याचे काम या देवाने केले आहे.
यासाठी आपणही भगवंताची सेवा मनोभावे करण्यासाठी कृष्ण,संत ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम यांचा अनुग्रह करण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांची संघटना उभी करीत स्वराज्य निर्माण केले. त्यांनी सुद्धा भगवंतांचे स्मरण करून अनुकरण करीत स्वराज्याचा इतिहास निर्माण केला.
म्हणून या ईतिहासाने हिंदू समाजाला अमरत्व देण्याचे काम केले. समाज आणी संस्कृती फार महत्त्वाची असून यामध्ये भक्तीभाव खऱ्या अर्थाने नांदण्याची खऱ्या अर्थाने गरज असून वारकरी संप्रदायाचे विचार हे समाज संघटित करणारे असल्याचे प्रतिपादन वाबळे महाराज यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी सप्ताहाचे संस्थापक भाऊसाहेब कोल्हे, सुनिल कोल्हे, अनिल कोल्हे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे ,आळकुटीचे माजी सरपंच मधुकर जाधव, रामदास महाराज वराळ, भाजपचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव हारदे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त मनोहर राऊत, रामबुआ रासकर, सुरुची दूध उद्योग समूहाचे संचालक नाना पाटील लंके, भरत ढवळे, पोपटराव शेटे, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे संचालक भाऊ रसाळ, भिमाजी शेटे गुरुजी, किशोर हारदे, रामदास हारदे, पोपटराव कळमोडे,पोटे महाराज, मंळगंगा पतसस्थेंचे अधिकारी कचरदास साळवे, कचरु महाराज वरखडे, एकनाथ वाव्हळ, बाबाजी शिरोळे , अनिल वायकर,आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाऊसाहेब कोल्हे ,भरत ढवळे, रामदास महाराज वराळ, विलासराव हारदे पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कोल्हे व अनिल कोल्हे यांनी केले यांनी केले. शेवटी भरत ढवळे यांनी आभार मानले.
स्वागत करा हो मुलिच्या जन्माचे, सार्थक होईल भारतभुमीचे या वाबळे महाराज यांनी केलेल्या काव्याला उपस्थीतांनी जोरदार टाळ्या वाजवून दादा दिली. यावेळी मुलिच्या जन्माचे स्वागत कसे करायचे याची माहिती देत त्यांनी सावित्रीबाई फुले आणी फातीबा शेख यांनी मुलिसांठी शाळा काढल्याची माहिती देत त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जयजयकार केला.
Post a Comment