मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार...

औरंगाबाद :  मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार, बीकेसीचा हिशोब कधी देणार, या सर्वांच्या मागे ईडी कधी  लावणार? असे सवाल उपस्थित करत त्यांनी किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला. 


ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

अंधारे म्हणाले की, माझ्या सभांना इतकी गर्दी कशी जमते ? हे लोक येतात कुठून? मी संताचा विचार सांगते. मी भाजपचा द्वेषपूर्ण राजकारण संपवण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढत आहे. या देशाची नागरिक म्हणून काही प्रश्न पडले आहेत, त्याची उत्तरे शोधत आहे.

त्यांनी यावेळी मनसेच्या आजच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post