शिक्षक भारती संघटना समन्वय समितीचा घटक आहे. तसे पत्रच राज्य सरकारला शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी दिले असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत
संपाच्या हाकेला प्रतिसाद देऊन जुनी पेन्शन मिळेपर्यंत लढा सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या निर्णयानुसार २१ ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत जुनी पेन्शन योजना लागू करा या एका मागणीसाठी बेमुदत संपाची मानसिक तयारी करण्याची मोहीम हाती घेतली
आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी दिली .राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेमुदत संपात सहभागी होण्याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि जुन्या पेन्शनची मागणी
पूर्ण होईपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जनजागृती करणे.
२१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकारी यांनी शाळांना भेटी देऊन बेमुदत संपाची तयारी करायची आहे. समन्वय
समितीने संपाची तारीख निश्चित केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मागणी पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घ्यायचा नाही, असा निर्धार शिक्षक नेते सुनिल गाडगे, जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब जगताप,जिल्हा महिला अध्यक्षा आशा मगर, सोमनाथ बोंतले, नगर जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, नगर जिल्हासचिव विजय कराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, सचिव महेश पाडेकर, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, योगेश हराळे, संतोष शेंदूरकर. संभाजी पवार, संजय भुसारी . हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष
शेंदुरकर, संजय भुसारी, सिकंदर शेख, विलास गाडगे. संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे .महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर,
शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी केला आहे.
Post a Comment