पुणे: सेक्स्टॉर्शनमुळे कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता पोलिसांच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानमधील एक गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे.
तरुणांच्या आत्महत्येप्रकरणा पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान ही माहिती दिली आहे. राजस्थानचे गुरुगोठडी हे संपूर्ण गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
पुण्यात सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून तरुणांना धमकावलं जात होतं, त्यामुळे दोघांनी आत्महत्या केली होती. त्या घटनेचा तपास पुणे पोलीस करत होते. ज्या मोबाईल नंबरवरुन या मुलांना खंडणी मागितली जात होती, त्या नंबर्सचं लोकेशन पुणे पोलिसांनी शोधलं. ते लोकेशन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडी गावातील निघाले.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने चौकशीदरम्यान काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या. गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत, असं त्याने सांगितलं. हे अत्यंत धक्कादायक आहे.
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार केली जातात. त्यानंतर मुलगी बोलतेय असं सांगून तरुणांना जाळ्यात ओढलं जातं. त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांचे काही फोटो, व्हिडिओ शेअर करायला सांगितले जातात.
त्यानंतर हे फोटोज मॉर्फ करुन, अर्थनग्न करुन त्यांना पाठवले जातात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. त्यांची फसवणूक केली जाते. सध्या हे प्रकार फार वाढले आहेत.
Post a Comment