औरंगाबाद ः संभाजीनगरात प्रेम प्रकरणातून स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. स्वत:ला पेटवून घेणारा गजानन मुंडे हा तरुण संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात पीएचडी करत होता. त्याचं तरुणीवर प्रेम होते.
पण, तरुणीने लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागात तरुणाने तरुणीला पेटवलं आणि स्वत:लाही पेटवून घेतलं. आणि नंतर तरुणीला मिठी मारली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तरुणाने मिठ्ठी मारली. यामध्ये ती तरुणी गंभीर जखमी झाली असून ही तरुणी 50 टक्के भाजली. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण, जळीत प्रकरणात मृत गजानन मुंडे याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई वडिलांनी लग्न करण्यासाठी तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जबाब तरुणीने दिला आहे. यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment