गडचिरोली : महिला कर्मचार्याला आपल्या कार्यालयात बोलवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ओंकार रामचंद्र अंबपकर (रा. गुलमोहर कॉलनी, गडचिरोली) असे आरोपी लेखा व वित्त अधिकाऱ्याचे नाव आहे. पीडित महिला ही गडचिरोली जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.
अंबपकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने पीडित महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलवून विनयभंग करायचे.
16 ते 20 नोव्हेंबर यादरम्यान कामाच्या बहाण्याने आपल्या केबिनमध्ये चार वेळा बोलून सतत विनयभंग केला, अशी तक्रार पीडित महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून लपून बसलेल्या अधिकारी अंबपकर याला मोठ्या शिताफीने अटक केली.
त्याला मंगळवारी म्हणजेच आज न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधिकारी अरविंद कतलाम यांनी दिली आहे.
Post a Comment