सावित्रीबाई फुले यांच्याबाबत राज्यपाल बोलले तेव्हा भाजप कोठे होते...

बारामती : राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले. एका चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवला. त्यावेळी विरोधक शांत का होते? असा सवाल करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना विचारला आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यभर राजकीय आखाडा तापला आहे. भाजप व मनसे आंदोलने करत आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले आहे.

राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले. एका चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवला. त्यावेळी विरोधक शांत का होते, असा सवालही रोहित पवारांनी भाजपला विचारला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post