महाविकास आघाडीला धोका नाही....

मुंबई : जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद आहेत, तोपर्यंत महाविकासआघाडीला किंचितही धोका नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.


राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून भाजप, शिंदे गट व मनसेकडून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याशी सहमत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडी फुटू शकते, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

पवार म्हणाले की, मला सावरकरांविषयी बोलायचे नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. राज्यात बरेच भीषण प्रश्न आहेत. राजकीय नेते, मीडिया यांनी कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचं, हे ठरवले पाहिजे. 

अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टींबाबत, व्यक्तीचा उल्लेख करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये,' अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post