मुंबईवर काहीच परिणाम होणार नाही....

पुणे ः मुंबई मधला जो गुजराती आहे, तो इलेक्ट्रॉनिक बाजारांमधला गुजराती नसून दाणा आणि दवा बाजारात गुंतलेला गुजराती आहे आणि अधिक प्रमाणात दलाली करतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबई मधून गुजराती जरी निघून गेला तरी त्याचा मुंबईवर अजिबात परिणाम होणार नाही. 


म्हणून जी परिस्थिती राजस्थानी मील मालकांची झाली तशी परिस्थिती या गुजराती व्यापाऱ्यांची सुद्धा होईल. याची जाणीव राज्यपालांना नसावी, म्हणून त्यांनी अस विधान केले असावे. असा सूचक टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे राजपाल भगत सिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना बोचणारं वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले, तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असं व्यक्तव्य कोश्यारी यांनी केले आहे. या व्यक्तव्यानंतर महाराष्ट्रातून राज्यपालांवर टीकेची झोड उठू लागली आहे. राज्यपालांच्या या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांचं मत व्यक्त केले आहे.
येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी सक्रिय होताना दिसत आहे. आज पुण्यात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात येत आहे. यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या विधानाबाबत प्रश्न विचारला असताना ते म्हणाले, मुंबईची आताची परिस्तिथी काय आहे, मागच्या काळातली परिस्तिथी काय होती हे समजून घेण्याची गरज आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post