राज्यपाल यांच्या विधानाशी सहमत नाही...

मुंबई ः राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाशी सहमत नाही. मुंबईसाठी मराठी माणसाने दिलेलं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. मराठी माणसांमुळे मुंबईला वैभव प्राप्त मिळाले. अवमान होवू नये याची काळजी राज्यपालांनी घ्यायला हवी म्हणत एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना सुनावले आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावरून टीकास्त्र सोडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोश्यारी यांचे वक्तव्य समर्थन करण्यासारखे नाही असे स्पष्ट केले आहे. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यावर बोलले आहेत.  

मराठी माणसांच्या बलिदानावरच मुंबई उभी राहिली आहे. मुंबईच्या महत्त्वामुळे हे सर्व आहे. याचं श्रेय इतरांना देता येणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post