आरक्षणाच्या चेंडूवर दिग्गज बाद...

नगर : जिल्हा परिषदेच्या मैदानावर आरक्षणाच्या चेंडूवर दिग्गज बाद झालेसे आहे. त्यांना आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात आता बदली खेळाडू उभा करावा लागणार आहे. या बदली खेळाडूच्या माध्यमातून गटात अन् गणावर वर्चस्व निर्माण करावे लागणार आहे.


जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झेडपीच्या 85 गटांसाठी तर त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आल्या. 

आरक्षण सोडतीच्या अगोदर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरण्यासाठी अनेकांनी तयारी केली होती. जणू क्रिकेटच्या मैदान खेळायला उतरण्यासाठी सराव केसा होता. मात्र आरक्षण पडल्याने अनेकांचा सराव वाया गेला आहे. तर काहींनी सराव केलेला आता त्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला फायदा होणार आहे.

या आरक्षण सोडतीमध्ये काही खुशी तर काही गम अशी स्थिती होती. यामुळे निवडणुकीच्या कामाला लागलेल्यांची मोठी अडचण झाली आहे. या निवडणुकीच्या सामन्यात काहींचे नशिब खुलले आहे. गट आणि गणाची मोडतो होवून देखील त्यांचा गट सर्वासाधारणसाठी खुला राहिला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण अद्याप झालेले नसले तरी यंदा झेडपीत महिला राज राहणार आहे. 85 सदस्यापैकी आधीच 43 महिला सदस्यांसाठी गट आरक्षीत असून काही ठिकाणी खुल्या प्रवर्गातून देखील महिला निवडणूक लढविण्याच्या तयारी आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिलांची संख्या ही अधिक राहण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय गट व आरक्षण

अकोले तालुका ः समशेरपूर (सर्वसाधरण), देवठाण (सर्वसाधारण स्त्री), धुमाळवाडी (अनुसूचित जमाती स्त्री), राजूर (नागरिकाचा मागास प्रवर्ग), पाडाळणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), कोतूळ (सर्वसाधारण महिला).

संगमनेर तालुका ः समनापूर (सर्वसाधारण स्त्री), तळेगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग), आश्वी बुद्रुक (अनुसूचित जमाती स्त्री), जोर्वे (सर्वसाधारण), संगमनेर खुर्द (सर्वसाधारण), घुलेवाडी (अनुसूचित जाती स्त्री), धांदरफळ बुद्रुक (सर्वसाधारण स्‍त्री), चंदनापुरी (सर्वसाधारण स्त्री), साकूर (सर्वसाधारण), बोटा (सर्वसाधारण).

कोपरगाव तालुका ः सुरेगाव (अनुसूचित जमाती), शिंगणापूर (अनुसूचित जमाती स्त्री), करंजी बुद्रुक (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), संवत्सर (सर्वसाधारण स्त्री), कोळपेवाडी (सर्वसाधारण स्त्री), पोहेगाव बुद्रुक (सर्वसाधारण).

राहाता तालुका ः पुणतांबे (सर्वसाधारण स्त्री), वाकडी (सर्वसाधारण स्त्री), साकुरी (सर्वसाधारण), बाभळेश्वर (सर्वसाधारण स्त्री), लोणी खुर्द (सर्वसाधारण स्त्री), कोल्हार बुद्रुक (नागरिकांचा मागास प्रवर्ग).

श्रीरामपूर तालुका ः उंदीरगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग), टाकळीभान (सर्वसाधारण स्त्री), दत्तनगर (नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री), बेलापूर बुद्रुक (नागरिकांचा मागास प्रवर्ग), निपाणी वडगाव (सर्वसाधारण स्त्री).

नेवासे तालुका ः बेलपिंपळगाव (अनुसूचित जमाती स्त्री), सलाबतपूर (सर्वसाधारण स्त्री), भेंडे बुद्रुक (सर्वसाधारण स्त्री), भानसहिवरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), पाचेगाव (अनुसूचित जमाती), शिंगणापूर (सर्वसाधारण स्त्री), सोनई (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), चांदे (अनुसूचित जाती स्त्री).
शेवगाव तालुका ः दहिगावने (नागरिकांचा मागास प्रवर्ग), मुंगी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), बोधेगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग), भातकुडगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), अमरापूर (अनुसूचित जाती).

पाथर्डी तालुका- कासार पिंपळगाव (सर्वसाधारण स्त्री), भालगाव (सर्वसाधारण), माळी बाभूळगाव (सर्वसाधारण), मिरी (सर्वसाधारण), टाकळी मानूर (सर्वसाधारण).

नगर तालुका ः वडगाव गुप्ता (सर्वसाधारण स्त्री), जेऊर (सर्वसाधारण स्त्री), नागरदेवळे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), चिचोंडी पाटील (सर्वसाधारण स्त्री), दरेवाडी (सर्वसाधारण), नवनागापूर (अनुसूचित जाती स्त्री), वाळकी (सर्वसाधारण).

राहुरी तालुका ः सात्रळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग), टाकळीमियाँ (सर्वसाधारण स्त्री), उंबरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), गुहा (सर्वसाधारण), बारागाव नांदूर (अनुसूचित जमाती), वांबोरी (सर्वसाधारण).

पारनेर तालुका ः ढवळपुरी (अनुसूचित जमाती), टाकळी ढोकेश्वर (सर्वसाधारण), कान्हूर पठार (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), निघोज (सर्वसाधारण), जवळा (सर्वसाधारण), सुपा (सर्वसाधारण).

श्रीगोंदे तालुका ः पिंपळगाव पिसा (सर्वसाधारण स्त्री), कोळगाव (अनुसूचित जाती स्त्री), मांडवगण (अनुसूचित जाती स्त्री), आढळगाव (अनुसूचित जाती), बेलवंडी (अनुसूचित जाती), लिंपणगाव (सर्वसाधारण), काष्टी (सर्वसाधारण).

कर्जत तालुका ः मिरजगाव (अनुसूचित जाती स्त्री), चापडगाव (अनुसूचित जाती), कोरेगाव (अनुसूचित जाती), कुळधरण (सर्वसाधारण), राशीन (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री).

जामखेड तालुका ः साकत (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), जवळा (नागरिकांचा मागास प्रवर्ग), खर्डा (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री).

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post