नगर तालुक्यात उलथापालथ...

नगर : नगर तालुक्यातील अनेक दिग्गज आरक्षणाने बाजूला गेले आहेत तर काहींना फायदाही झाला आहे. नगर तालुक्यात उलथापालथ... गुप्ता जिल्हा परिषद गट ओपन महिला राखीव झाला असल्याने विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांची अडचण झाली आहे पण त्याऐवजी रावसाहेब पाटील शेळके संधी घेऊ शकतात.

नवनागापूर जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने विद्यमान सदस्य माधवराव लामखडे यांची अडचण झाली आहे. मात्र वडगाव गुप्ता मधुन त्यांच्या सुनबाई डॉ . प्रांजल लामखडे या निवडणूक मैदानात उतरणारण्याची शक्यता आहे. 


नागरदेवळे जिल्हा परिषद गट ओबीसी महिला राखीव झाला असल्याने विद्यमान सदस्य शरद झोडगे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नीला संधी मिळू शकते. माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय कर्डीले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले या निवडणुकीत उतरू शकतात 

दरेवाडी जिल्हा परिषद गट खुला पुरुष  झाल्याने विद्यमान सदस्य संदेश कार्ले यांची सोय झाली आहे तर तयारीला लागलेले बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डीले यांचीही सोय झाली आहे. दीपक कार्ले सुद्धा जिल्हा परिषद लढण्याची तयारी करत आहेत.

चिंचोडी पाटील जिल्हा परिषद गट ओपन महिला झाल्याने विद्यमान सभापती सुरेखा गुंड यांची सोय झाली असून संभाव्य उमेदवार प्रवीण कोकाटे यांना त्यांच्या पत्नीसाठी तयारी करावी लागणार आहे. माजी सदस्या महानंदा लांडगे यांना संधी मिळणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post