देव नदीवरील पुलाचे लोकापर्ण

नगर ः गेल्या अनेक वर्षांपासून देव नदीवरील पुलाचा प्रश्न होता. हा प्रश्न सुटण्यासाटी विळद ग्रामस्थांसह सरपंच संजय बाचकर यांच्या प्रयत्नानाने मार्गी लागलेला आहे. 


हा पूल वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. त्याचा लोकापर्ण सोहळा  सरपंच संजय बाचकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

विळद येथील देव नदीवर पुल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. या अनुषंगाने सरपंच संजय बाचकर यांनी पाठपुरावा केला. 

त्या पाठपुराव्यामुळे देव नदीवर पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचे लोकार्पण आज (ता. 31)ला सरपंच संजय बाचकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी उत्तमराव अडसुरे, भास्कर जगताप, सोमनाथ जगताप,  कैलास जगताप,  बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते. नदीवर पूल झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post