पाथर्डी : मुळा पाटबंधारे विभाग अंतर्गत मुळा उजवा कालवा पाथर्डी शाखा कालवा व अंतिम वितरीकेच्या विशेष दुरुस्तीसाठी १८ कोटी ७२ लाखाचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे.
नवीन राज्य सरकारने २६ जुलै २०२२ ला आदेश काढला असल्याची माहिती देताना राजळे म्हणाल्या की, मुळा पाटबंधारे विभाग अंतर्गत मुळा उजवा कालवा पाथर्डी शाखा कालवा व अंतिम वितरीकेच्या विशेष दुरुस्ती साठी १८ कोटी ७२ लाखाच्या कामासाठीचे शासन निर्णय दि. २६ व २७ जुलै २०२२ ला शासनाच्या जलसंपदा विभागाकडून काढण्यात आले.
२६ व २७ जुलै २०२२ ला जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय क्र. प्रमाप्र-२०२२ प्र.क्र.१९७/२०२२) सिंव्य (कामे) नुसार मुळा उजवा कालवा पाथर्डी शाखा सा.क्र.२५ कि.मी. ते सा.क्र.४३ कि.मी. व वितरिका क्र. २ वरील कामासाठी ४ कोटी ७० लक्ष ७६ हजार रुपये. शासन निर्णय प्र.क्र. १९५/२०० नुसार मुळा उजवा कालवा अंतिम वितरकेच्या विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी ३८ लक्ष ८४ हजार रुपये.
शासन निर्णय प्र.क्र.१९८/२०० नुसार पाथर्डी शाखा कालवा अंतीम वितरिका व वितरिका क्र.३ वरील कालवा दुरुस्तीसाठी ४ कोटी ५८ लक्ष ७६ हजार रुपये. शासन निर्णय प्र.क्र.१९६/२०० पाथर्डी शाखा कालवा सा.क्र. ० कि.मी. ते सा.क्र. २५ कि.मी. व वितरीका क्र. १ वरील कालवा दुरुस्तीसाठी ४ कोटी ६४ लक्ष रुपये.
शासन निर्णय प्र.क्र.१९९/२०० नुसार पाथर्डी शाखा कालवा सा.क्र. १८/२८० कि.मी. ते सा.क्र. १८/५८० कि.मी.वरील कालवा दुरुस्तीसाठी ४० लक्ष ३३ हजार रुपये असा एकूण १८ कोटी ७२ लक्ष रुपये किंमतीच्या कामासाठी प्रशासकीय
मान्यता मिळाली आहे. यात प्रामुख्याने कालव्यावरील बांधकामे, अस्तरीकरण व भराव मजबुतीकरण ही कामे करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सन २०१० पासून आतापर्यंत एवढया मोठया प्रमाणात कालवा दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नव्हता.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपा शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून मतदारसंघातील विकास कामांना तसेच प्रलंबीत कामांना मोठया प्रमाणात निधी मिळत आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहे.
विविध विकास कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. या सर्व कामांसाठी नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा केल्यानुसार हा भरीव निधी प्राप्त
झाला आहे. हा निधी दिल्याबद्दल आमदार राजळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. कालवा दुरुस्तीच्या कामांना मोठा निधी मिळाल्याने पाटपाणी लाभक्षेत्रातील पाटपाणी वितरणातील समस्या दूर होणार असल्याने लाभार्थी शेतकर्यामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment