उध्दव ठाकरे यांच्या आदेश अंतिम मानू

पाथर्डी : शिवसैनिकांनी कोणतेही परवाना करता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो  आदेश देतील तो अंतिम मानून येणाऱ्या काळात पक्ष वाढीसाठी काम करून सर्व सर्वसामान्य लोकांसाठी काम करावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी केले.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका शिवसेनेच्या वतीने पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भगवान दराडे, लोकाधिकार समितीचे सेक्रेटरी शरद एक्के, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगल म्हस्के, मीरा बडे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी काटे, भाऊसाहेब धस, नवनाथ चव्हाण, सचिन नागपुरे, सागर राठोड, सुनील परदेशी, नवनाथ उगलमुगले, उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक मनीषा खेडकर, सहाय्यक आदी सेविका लीला लष्करे आदी उपस्थित होते. 

दळवी म्हणाले की, ठाकरे यांना मानणारा प्रत्येक कार्यकर्ता हा शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. भविष्यकाळात संघर्ष करण्याची वेळ आली तरी शिवसैनिकांनी पक्षासोबत ठाम उभे राहावे, असे तो म्हणाले.

यावेळी तालुकाप्रमुख भगवान दराडे म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जे राजकीय आलेले संकटे ते दूर करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एक संघ राहून तळागाळापर्यंत ग्रामीण भागातील शेवटच्या वाडी वस्तीवर शिवसेनेचे विचार घराघरात पोहोचावेत. 

येणाऱ्या निवडणुकीत सर्वांनी ताकदीनिशी निवडणूक लढवून शिवसेनेला पुन्हा उभारी द्यावी, असे आवाहन यावेळी दराडे यांनी शिवसैनिकांना केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post