औरंगाबाद : अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) चौकशांना घाबरून कुणीही आमच्याकडे (शिंदे गट किंवा भाजप) येऊ नका, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे.
पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केंद्रीय तपासयंत्रणांनी सूडानं काम केले असते, तर न्यायालयाने कारवाई झालेल्यांना दिलासा दिला असता. सूडाच्या कारवाईची आवश्यकता काय? एवढं मोठं सरकार बनवले.
एकतरी सूडाची कारवाई केली का? एकाने तरी सांगितले का, की ईडीची नोटीस पाठवली म्हणून तिकडे गेलो?. ईडीच्या भीतीने कुणीही इकडे येऊ नका. दडपणाखाली येऊ नका," असे ते म्हणाले.
ना, कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. चौकशीला सामोरे जाऊद्या. त्यातून पुढे येईल ते कळेलच, असे ते म्हणाले.
शिंदे यांच्या रोखठोक बोलण्याने आता शिंदे गट व भाजपात प्रवेश करणार्यांची संख्या कमी होण्याची शक्यता दिसून येत आहे. जे चौकशीच्या जवळ पोहचलेत ते आपल्या हालचाली थांबवतील, असेच आता स्पष्ट होत आहे.
Post a Comment