नगर : अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिचा छळ करण्यात आला आहे. तिच्यावर अत्याचार करून गर्भवती केले. बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या पीडित अल्पवयीन मुलीवर पुणे येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नगर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या तरूणाचे अल्पवयीन मुलीसमवेत लग्न झाले होते. लग्नासाठी झालेल्या खर्चाची मागणी करत पती, सासू-सासर्याने फिर्यादीचा छळ केला. मारहाण, दमदाटी केली.
तिला गर्भधारणा झाल्यानंतर हे मुल माझे नाही म्हणून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून गर्भपाताच्या गोळ्या बळजबरीने खायला दिल्या. तिचा बळजबरीने गर्भपात करण्याचा प्रयत्न केला.
तिने उपचारादरम्यान राजगड (पुणे) पोलिसांना जबाब दिला. राजगड पोलिसांनी तो जबाब येथील एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला.
एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीचा पती, सासू, सासरेविरूध्द अत्याचार, छळ, मारहाण, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० नोव्हेंबर २०२१ ते २६ जून २०२२ दरम्यान वेळोवेळी घडली आहे.
Post a Comment