बंदुकीतून सुटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू...


श्रीरामपूर : शहरातील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत भरणा करण्यासाठी आलेल्या अशोक सहकारी बँकेच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटली. त्यात प्रगतीशील शेतकरी अजित विजय जोशी यांना लागली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

जोशी हे बँकेच्या कामासाठी आले असता ते कामकाज आटोपून आपली मोटरसायकल आणायला गेले असता, अशोक बँकेचे सुरक्षा रक्षक दशरथ पुजारी यांच्याकडे लोड असलेल्या बंदुकीतून अचानक गोळी सुटून जोशी यांच्या डोक्यात गोळी घुसली.त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळले.      
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरिक्षक संजय सानप, हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. सदरची घटना कशी घडली.

या दुर्दैवी घटनेची सखोल माहिती घेऊन पुढील तपास कसून सुरू आहे. सुरक्षा रक्षकास विचारपूस करून ताब्यात घेण्यात आले. या घटनेने श्रीरामपूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बघ्यांनी गर्दी केली होती. .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post