मांडले अभिनंदनाचे ठराव...

पाथर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या वर्षातील प्रत्येक क्षण नवीन पिढीसाठी देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा आहे. 


भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर तिरंगा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी केले.

आमदार मोनिका राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पाथर्डी तालुक भाजपाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन व सुचना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी खेडकर बोलत होते.

माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, जेष्ठ नेते अशोक चोरमले, माजी सभापती गोकुळ दौंड, काकासाहेब शिंदे, नंदकुमार शेळके, बजरंग घोडके, रविंद्र वायकर, विष्णुपंत अकोलकर, पुरुषोत्तम आठरे, अजय भंडारी, प्रवीण राजगुरू, भगवान साठे, काशीबाई गोल्हार, मंगल कोकाटे, मनिषा घुले, रमेश गोरे, नामदेव लबडे, अनिल बोरुडे, बबन बुचकुल, सुनिल ओव्हळ, सुनिल परदेशी, भगवान आव्हाड,नारायण पालवे, नितीन एडके, महादेव जायभाये, अक्षय काळे, नवनाथ नरोटे, प्रा.रमेश काटे, प्रमोद भांडकर, राजेंद्र साप्ते आदि प्रमुख उपस्थित होते.

खेडकर म्हणाले ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान सरकारकडून साजरा होणाऱ्या हर घर तिरंगा कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर गीत, तिरंगा यात्रा, मेळावे, सार्वजनिक ठिकाणी होर्डीग्ज लावावे, रघुपती राघव राजाराम व वंदे मातरम गीत लावुन प्रभातफेरी काढावी, सर्व निवासी संघटना,युवा संघटना, साधुसंताचे मठ व इतर सामाजिक संघटनाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकावा. 

राष्ट्रध्वज खरेदी करावेत व नागरिकांनाही खरेदी करण्यास प्रोत्साहित करावे असेही खेडकर यावेळी म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष अजय भंडारी यांनी,सुत्रसंचालन युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर,तर आभार सचिन पाटसकर यांनी मानले.

यावेळी ज्येष्ठ भाजपा नेते अशोक चोरमले यांनी पाथर्डी शेवगाव मतदार संघ १९९५ पासून म्हणजे २७ वर्षापासून मंत्रीपदापासून वंचित आहे. आमदार मोनिका राजळे यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदामुळे संपूर्ण नगर जिल्ह्याचा अभ्यास आहे. त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

भाजपाच्या आमदार म्हणुन त्यांची दुसरी टर्म आहे. अत्यंत संयमी, कर्तुत्ववान,अभ्यासू सर्वांना बरोबर घेऊन कार्यकर्ते सांभाळण्याचे कौशल्य, संघटन त्यांच्याकडे आहे. विकासकामे व प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी जिल्ह्यात अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. 

त्यामुळे भाजपाला जिल्ह्यात त्यांचा फायदा होईल असे सांगत जिल्हा भाजपासह संपुर्ण नगरकरांची इच्छा आहे की आ.मोनिका राजळे यांना महिला प्रतिनिधी म्हणुन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात कॅबीनेट मंत्री म्हणून संधी मिळावी व नगर जिल्ह्यातील पाहिली महिला मंत्री होण्याचा मान मिळावा असा ठराव मांडला.

त्यास अभय आव्हाड, गोकुळ दौंड, धनंजय बडे, पुरूषोत्तम आठरे, मंगल कोकाटे, अजय भंडारी, महादेव जायभाये, सचिन वायकर यांनी अनुमोदन दिले व एकमताने ठराव मंजूर झाला.

राष्ट्रपती निवड झाल्याबद्दल द्रोपदी मुर्मू यांच्या अभिनंदनाचा, राज्यात नवीन स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या अभिनंदनाचा तसेच जनतेतुन नगराध्यक्ष व सरपंच निवड करण्याचा शासन निर्णय घेऊन ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.

यावेळी बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री कै.सरस्वती बच्चू पाटील यांना पाथर्डी तालुका भाजपाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post