नगर : जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आढळगाव जिल्हा परिषद गटासाठी अनुसूचित जाती या प्रवर्गाचे आरक्षण निघाले आहे.
तसेच कोपरगाव तालुक्यातील काही गटातील आरक्षण वादाच्या भोवर्यात सापडले आहे. या आरक्षणावर हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नुकचीच आरक्षण सोडत काढण्यात आली. आढळगावची प्रक्रिया पार पाडताना जिल्हा प्रशासन चुकले व गोंधळ उडाला आहे.
२००२नंतर जो गट आरक्षित झाला होता तो गट वगळून आरक्षण काढायचे असे असताना आढळगाव जिल्हा परिषद गटात २००७साली अनुसूचित जातीचे प्रवर्गासाठी आरक्षण झालेले असताना पुन्हा २०२२ला हा गट आरक्षित करण्यात आला.
या गटाचे आरक्षण हे २००६च्या राजपत्राला अनुसरून काढले आहे, असे अधिकारी सांगतात मात्र या राजपत्रात हा गट २००७साली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असल्याची नोंद केली असल्यामुळे हा गोंधळ झाला आहे.
त्यामुळे या गटाचे आरक्षण बदलण्यासाठी हरकती दाखल झाल्या आहेत तर काहींनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या गटाचे आरक्षण बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तशीच परिस्थिती कोपरगावातील गटांची झालेली आहे. येथील काही गटात पूर्वी आरक्षण निघालेले असताना परत तेच आरक्षण निघाले आहे. त्यामुळे कोपरगावातूनही हरकती दाखल होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्य निवडणूक आयोगाकडेही या संदर्भात तक्रारी होणार आहेत.
Post a Comment