पारनेर : दिवंगत गुलाबराव शेळके यांनी मोठ्या कष्टातून महानगर बँक उभी केली आहे. या बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी या इमारतीच्या माध्यमातून मुंबई ते स्वप्न साकार केले असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहे.
मुंबईसारख्या मोठ्या शहरात जीएस महानगर बँकेचे काम कौतुकास्पद व गौरवास्पद आहे. या बँकेने रोजगाराबरोबर व्यवसायाची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले.
जीएस महानगर को.आँपरेटिव्ह बॅंक यांच्या नुतन प्रशासकीय कार्यालय भूमिपूजन बुधवारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या भुमीपुजन सोहळ्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार ,आमदार रोहित पवार, ज्येष्ठ संचालिका सुमनताई शेळके, जीएस महानगर बॅंकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके , जिल्हा बॅंकेचे संचालक व सभापती प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष भास्कर कवाद, कॅप्टन अभिजित आडसुळ, कार्यकारी संचालक एस. टी. कांचन माजी आमदार अडसूळ, सुनील साळवी, भानुदास खोसे, बन्शी बागल, सुरेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र इथापे, दत्तात्रय कुलट, सुरेश पठारे गोरख रोहकले, जि.प.सदस्य मानसिंग पाचुंदकर ,सुनिल हजारे ,सचिन गोडसे, इंद्रभान शेळके, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, उपाध्यक्ष सनी सोनावळे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्व. गुलाबराव शेळके यांचे स्मरण निश्चित होते.सहकार क्षेत्रात महानगर बँकेने नावलौकिक मिळविला आज गुलाबरावांना आज निश्चित आनंद झाला असता त्यांनी लावलेले रोपट आज वटवृक्ष झाला आहे.
महाराष्ट्रात अनेक सहकारी आले बँका काढले परंतु महानगर बँकेने मुंबईचा राज्यांमध्ये एकाच आदर्श उभा केलाय. त्यामुळे एक देखनी वास्तु उभी राहीली. जीएस महानगर बँकेचा कारभार पाहू इतर बँकेना आदर्शवत काम इमारत देखील सर्वात वेगळी ठरेल.
कामाची पद्धत जवळुन पाहिली गुलाबराव नेहमी बँकेच्या बाबतीत शिस्त ठेवली त्यांच्या मागे उदय देखील हे जपतो आहे. चांगले ध्येय घेऊन वाटचाल केल्यास सभासदांना समाधान वाटने सारखे काम सुरू आहे.
स्पर्धा खुप मोठी आहे केंद्र सरकार अशा विचारात आहे.कमी बँका ठेवून इतर बँक त्यात विलीनीकरण करण्याचा त्यांचा मानस होता. पारनेर मधील पतसंस्थेचा कारभार उत्तम सुरू आहे. कर्मचारी जास्त पारनेर मधील त्यांनाही घरबांधणी सह इतर कर्जे दिले जातात .इमारती या विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्या पाहिजे.
सोलर ची व्यवस्था पर्यावरण पुरक देखील आसेल गुलाबराव शेळके यांनी घालुन दिलेल्या आर्थिक शिस्त अशीच पुढे चालु राहुद्या तिस-या लाट येऊ न देण्यासाठी नियमांचे पालन करा वेळेला महत्त्व दिले पाहिजे.
अध्यक्ष पदाची जबाबदारी दिले जिल्हा बँकेत दबाबवाखाली काम करण्याची गरज नाही आर्थिक शिस्त लावा आम्ही सर्व सोबत आहोत चांगले काम दोन्ही ठिकाणी आपली भुमिका ठेवा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करुन शरद पवार साहेबांच्या हस्ते करू इमारत लवकर पुर्ण करा असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की जीएस महानगर बँकेच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे पारनेर तालुक्याचा उल्लेख करावाच लागतो दुष्काळाच्या कठीण परिस्थितुन आले मात्र कष्टाला त्यांनी मागे पुढे पाहीले नाही मुंबईत येऊन देखील केले खुप कष्ट केले.
गुलाबरावाचे नेतृत्व मिळाले एकत्र येऊन संस्था स्थापन केली आणि आज महानगर चा वटवृक्ष झाले आहे २ हजार ७०० कोटी ठेवी बँकेचे काम पाहुन जिल्हा बँकेची जबाबदारी उदय शेळके यांना दिली नियमात कसे राहीले पाहीजे .कर्ज वाटप कसे करावे असा कारभार जिल्हा बँकेत सुरू केले आहे.
अजित दादांची सारखी शिस्त लावण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे .आम्ही सर्व त्यांना सहकार्य करत आहोत ही इमारत म्हणजे बँकेचा विजय स्तंभ आहे सर्वांनी कष्ट केले आणि आज ही वास्तु उभी राहली आहे .
यावेळी पद्मश्री पोपट पवार म्हणाले की महानगर बँकेचा मुंबईमध्ये पारनेर करांना आधार होत आहे. महानगर बँकेचा मुंबईमध्ये पारनेर करांना आधार होत आहे. दुष्काळात होरपळत असताना मुंबईत हाताला काम मिळण्यासाठी झाली असून महानगर बॅंकेचा वटवृक्ष गुलाबराव शेळके यांनी लावला आहे.त्यामुळे रोजगारा बरोबर एक आदर्श उद्योजक उभारण्याचे काम केले आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपल्या पाठीशी असल्याने याचा फायदा नक्कीच होणार आहे.
यावेळी जीएस महानगर बॅंकेचे अध्यक्ष अॅड उदय शेळके म्हणाले की गुलाबराव शेळके यांचे स्वप्न होते की आपल्या मालकीची प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी मुंबईत स्व मालकीची इमारत असावी. त्यामुळे आज जर गुलाबराव शेळके साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यांना मोठा आनंद झाला असता अशा भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवल्या. या महानगर बँकेचा ३.५ टक्के एनपीए असुन कोणतेही प्रकारच्या भागवन मला धक्का न लावता या प्रशासकीय इमारतीची उभारणी करणार आहे. तर या पुढील काळात झिरो टक्के करण्याचा मानस आमचा असून हे एनपीए आम्ही विकणार असल्याचे अध्यक्ष उदय शेळके यांनी सांगितले आहे.या कामात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोलाची मदत केली आहे.
या प्रशासकीय कामकाजासाठी असणारा या इमारतीसाठी ७० कोटी रुपये खर्च होणार आहे यासाठी १६० कोटी रुपये खर्च होणार आहे.त्यामुळे दिवंगत गुलाबराव शेळके यांच्या दुरदृष्टी मुळे ही इमारत उभी राहणार असल्याचे उदय शेळके आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव शिर्के आभार संचालक भानुदास खोसे यांनी केले.
Post a Comment