आळेफाटा : पुणे जिल्ह्यातील , जून्नर तालूक्यातील आळे शिवजन्मभूमी , (श्री क्षेत्र रेड़ा समाधी) येथील सुनीता संदीप बहिरट यांना विशेष हिरकणी पुरस्काराने उपस्थित मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले.
१४ डिसेंबरला गीता जयंती , मोक्षदा एकादशीचा दुग्धशर्करायुक्त योग जुळून आला होता. हिरकणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित राज्यस्तरीय हिरकणी साहित्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन विठूरायाच्या पावन नगरीत विठ्ठल इन , महावीर नगर या ठिकाणी केले होते.
संस्थेच्या अध्यक्षा वनमाला पाटील , संत सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, संन्माननीय संत सदगुरू चैतन्य मोरे महाराज ( संत तुकाराम महाराजांचे वंशज ) मा . रवी सोनार ( सर ) सामाजिक कार्यकर्ते ( विश्वविक्रमी कवी ) डॉ . प्रा . सदाशिव सुर्यवंशी ( केंद्रिय अध्यक्ष साहित्य संघ महाराष्ट्र राज्य ) आदि मान्यवरांच्या उपस्थित पार पडले. या सोहळ्याचे आयोजन , नियोजन अगदी वाखाणण्याजोगे होते.
कवयित्री बहिरट यांनी या पुरस्काराबद्दल अत्यंत भावुक होऊन प्रतिक्रिया दिल्या. ही आनंदाची पर्वणी, अविस्मरणीय सोहळा, जीवनाचे सार्थक झाले लेखणीचा सन्मान झाला.
माझे माहेर पंढरी सर्व कुंटूबियासह या कार्यक्रमचा आनंद घेता आला शब्दात मांडता येणार नाही खूप आनंद झाला माझ्या लेखनीवर विश्वास दाखवून मला या पुरस्काराने गौरविण्यात आले खरतर आत्मविश्वास वाढला.
आत्मिक समाधान मिळाले कौतुकाची थाप मिळाली. नक्कीच आनंदाचा क्षण आहे .याप्रसंगी हिरकणी सेवाभावी संस्था अध्यक्षा व सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानले. बहीरट यांना या आधीही ३१ जुलै २०२१ रोजी राज्यस्तरीय प्रेरणादायी पुरस्कार मिळाला आहे.
अभिनव खांन्देशचे संपादक सन्माननीय प्रभाकर सूर्यंवंशी यांनी कोविड काळात हा पुरस्कार आळे निवासस्थानी सर्व कुटूंबिय व आप्तजनाच्या उपस्थित प्रदान करण्यात आला होता.
या दोन्ही पुरस्कारामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आणि साहित्यिकांनी सुनीता बहिरट यांचे अभिनंदन केले आहे
Post a Comment