पारनेर : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने सफरचंदाची लागवड करण्यात आली.
यावेळी पारनेर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. विजया ढवळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने सफरचंदाची पंच्याहत्तर झाडे शनिवार (ता. १८)ला महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी निघोज परिसरातील शेतकऱ्यांना व महाविद्यालयातील विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, सफरचंद वृक्ष लागवड यासाठी हर्मन ९९ जातीचे रोपे हरियाणा येथून कुरिअरने मागवण्यात आली.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत सफरचंदाच्या शेतीसारखे अभिनव प्रयोग केले पाहिजे तसेच शास्वत शेती ही आज काळाची गरज आहे यासाठी आपण महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रयोग करत आहोत. असे प्रतिपादन केले.
यावेळी निघोज परिसरातील शेतकर्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांच्या कल्पनेतून महाविद्यालयात सफरचंद झाडाची लागवड केली आहे. महाविद्यालयातील हा उपक्रम जिल्हय़ातील नावीन्यपूर्ण उपक्रम ठरून परिसरातील शेतकरी या उपक्रमाचा बोध घेऊन सफरचंद शेतीच्या बागा मोठ्या प्रमाणात तयार करतील व त्याचा फायदा उत्पन्न निर्मिती वाढेल असे सांगितले.
या प्रसंगी डॉ. मनोहर एरंडे, डॉ. गोविंद देशमुख, प्रा. प्रविण जाधव, प्रा.आनंद पाटेकर, प्रा.पोपट सुबंरे ,प्रा. संदीप लंके, डॉ.माणिक शिंदे, प्रा. सोमनाथ धोंडे, प्रा.अक्षय अडसूळ, प्रा. तुषार जगदाळे, प्रा. संगीता मांडगे, प्रा. नीलिमा घुले, प्रा.केशर झावरे, प्रा. सोनाली काळे, प्रा.अश्विनी सुपेकर, प्रा. हर्षदा गाडीलकर, प्रा. अंजली बोठे, प्रा.रेश्मा चौधरी, प्रा. नम्रता थोरात, अक्षय घेमूड, किशोर बाबर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली सात ते आठ वर्षात मुलिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाविद्यालय परिसरातील तीन ते चार हेक्टर जमिनीत
विविध प्रकारचे फुले, आयुर्वेदिक रोपे, वनस्पती या माध्यमातून फुलबाग फुलवण्याचे काम केले आहे.यासाठी प्राचार्य डॉ सहदेव आहेर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन ही नापीक जमीनीवर बागबगीचा तयार केला आहे.
या परिसरातील असंख्य शेतकरी या बागेला भेट देऊन माहिती घेत असतात तसेच या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम प्राचार्य डॉक्टर आहेर व त्यांचे सहकारी सातत्याने करीत असतात.
सफरचंद शेतीचा प्रयोग राळेगण सिद्धी येथील शेतकऱ्यांनी केला आहे.त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. निघोज व परिसरातील शेती कुकडी डावा कालव्याने समृद्ध झाली आहे.मात्र सफरचंद शेतीचा प्रयोग अद्यापही या सोळा ते अठरा गावातील शेतकऱ्यांनी केला नाही.
तेच धाडस मुलिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. नियोजन उत्कृष्ट असल्याने ते यामध्ये नक्कीच यशस्वी होतील.कुकडी पट्ट्यातील शेतकऱ्यांना सफरचंद बाग हे एक मार्गदर्शन केंद्र ठरेल असा विश्वास या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कृषी विभागाने या बागेची दखल घेउन प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी निघोज ग्रामस्थांनी केली आहे.
Post a Comment