नगर ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच आहे. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगरमध्ये छापेसत्र सुरुच आहे. या चौकशीत काय सापडले आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर छापेसत्र सुरु आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून केंद्र सरकारला जोरदार टोलाही लगावला आहे.
सलग तिस-या दिवशी आयकर खात्याकडून चौकशी सुरू आहे. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगर, नंदूरबारमध्ये छापेसत्र सुरू आहे. या चौकशीमध्ये पथकांना काय सापडले हे मात्र स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या चौकशा फक्त त्रास देण्यासाठी तर नाही ना असा सवाल आता उपस्थित होत आहे.
कोल्हापुरात अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊस व घरावर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरूच आहे. पुण्यातही दोन ठिकाणी चौकशी सुरू आहे. अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे पथक तळ ठोकून आहे.
तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आयकर विभागाचे पथक दाखल झाले. तीन दिवसांपासून सुरू आहे आयकर विभागाकडून तपासणी आहे. तर नंदूरबारमधील समशेरपूरच्या आयान मल्टीट्रेड एलएलपी कारख्यान्यावर आयकर विभागाची टीम रात्री उशीरापर्यंत चौकशी करत होती.
कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात येत आहे. तसेच कारखाना व्यवस्थापनानेही मौन बाळगले आहे. एका प्रमुख अधिकाऱ्यासोबत 12 ते 15 जणांचे पथक असल्याचे समजते.
या चौकशा सुरु असल्या तरी त्यात काय पुढे आले याचा उलगडा होणे गरजेचे आहे. परंतु तशा कुठल्याच हालचाली होत नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे या चौकशा फक्त त्रास देण्यासाठी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Post a Comment