पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मुंबईतल्या कार्यालयावर सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. या छापेसत्राच्या विरोधात आता ऱाष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरू लागले आहेत.
पंचवटी सोसायटीत रजनी इंदूलकर व मोदी बागेत नीता पाटील यांच्या घरांवर छापे सत्र सुरू आहे. कोल्हापुरात अजित पवारांची बहिण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर छापा घालण्यात आला. तिथे अजूनही छापेसत्र सुरू आहे.
साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी कारखान्यातही छापेसत्र सुरू आहे. त्याशिवाय अहमदनगरमध्ये अंबालिका साखर कारखाना, बारामतीत सायबर डायनॅमिक्स डेअरी, दौंड साखर कारखाना इथेही छापेसत्र सुरू आहे.
याशिवाय आज सकाळी नंदूरबारमध्ये आयन मल्टीट्रेड साखर कारखान्यावर आयकर विभागाने कारवाई केली. त्यानंतर आता अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत.
पुण्यात काऊन्सिल हॉलबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच अशा समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत. पुण्यात अजित पवारांच्या दोन बहिणी राहतात. त्यांच्या घरांवरही छापेसत्र सुरूच आहे.
Post a Comment