राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता....

मुंबई : महाराष्ट्रात परतीचा पाऊस रेंगाळला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यात आणखी चार-पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. 


महाराष्ट्राबरोबरच गोव्यासह सहा राज्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे वेधशाळेने म्हटले आहे.

पाऊस परतीच्या मार्गावर असताना बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शुक्रवारी अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गोवा, कर्नाटक, केरळ, पद्दुचेरी येथेही पावसाची शक्यता आहे. नऊ ऑक्टोबरलाही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 


तामिळनाडू, पद्दुचेरी आणि इतर राज्यांमध्ये १० आणि ११ ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९६० नंतर दुसऱ्यांदा अशाप्रकारे पावसाचा मुक्काम वाढला आहे. 

२०१९ मध्ये नऊ ऑक्टोंबरपासून मान्सून परतण्यास सुरुवात झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात देशात जूनमध्ये ११० टक्के, जुलैमध्ये ९३ आणि ऑगस्टमध्ये ७६ टक्के पाऊस पडला. 

सप्टेंबरमध्ये १३५ टक्के एवढा रेकॉर्डब्रेक पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागात झाली आहे. या पावसामुळे अनेक भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post