राहुरी : दुबई येथे सुरू असलेल्या वर्ल्ड एक्स्पोला भेट देण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ गेले आहे.
वर्ल्ड एक्स्पोमध्ये 'हवामान आणि जैवविविधता सप्ताह' होत आहे. भारताच्या पॅव्हेलियनमध्ये हवामान आणि जैवविविधता सप्ताह अंतर्गत सादरीकरण होणार असल्याचे राज्यमंत्री यांनी समाज माध्यमावर प्रसिध्द केलेल्या पोस्टवर म्हटले आहे.
या सप्ताहासाठी राज्य सरकाराने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठवले आहे. हे शिष्टमंडळ दुबई येथे पोहचले आहे.
या शिष्टमंडळात प्रधान सचिव दिनेश वाघमारे, एमइडीएचे सूरज वाघमारे आदींचा समावेश आहे.
Post a Comment