विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून मिळू शकते पारनेर, पाथर्डी अन् श्रीगोंद्यातील एका नेत्याला संधी... सध्या नगर तालुक्याची चर्चा...

नगर : विधान परिषदेची निवडणूक अवधी असला तरी चर्चेचे गुर्हाळ सुरु झालेले आहे. उमेदवारी मिळणार असल्याची आशा बाळगून काहींनी मात्र मोर्चे बांधणी सध्या सुरु केली आहे. मतांती आकडेवारी जुळवाजुळव सुरु झाली. यामध्ये पाथर्डी, पारनेर अन् श्रीगोंदा तालुक्यातील काहींची स्पर्धा दिसून येत आहे.


विधान परिषद निवडणूक जशी जवळ येऊ लागली. तशा राजकीय हालचाली सुरु झालेल्या आहे. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शेवगाव तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता शेवगावचे नाव आता पिछाडीवर पडू लागले आहे.

आता पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्याचे नाव चर्चेत आलेले आहे. या तीन तालुक्यातून एका नेत्याला विधान परिषदेची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तीनही तालुक्यातील इच्छुकांनी त्यांच्या परिने तयारी सुरु केली आहे. यामध्ये श्रीगोंदा व पारनेर तालुक्याने आघाडी घेतली आहे.


या तीन तालुक्यातील नेत्यांच्या नावाच्या चर्चेत नगर तालुक्याचे नाव येऊ लागलेले आहे. मात्र त्यावर एकमत होईल की नाही होणार यावर सध्या चर्चा झडत आहे. ऐन वेळी पक्षच या भाऊगर्दीत सर्व बाजू पडताळून निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आगामी लोकसभेत फायदा होईल, या दृष्टीनेच विधान परिषदेसाठी उमेदवार निवडला जाणार आहे. त्यामुळे विधान परिषदेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची राष्ट्रवादीच्या गोटात जोरात सुरु आहे.

पाथर्डीतील सध्या एक तर श्रीगोंदे व पारनेरातील दोन जणांचे नाव सध्या चर्चेत आरे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत असून दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post